Friday 24 November 2017

Roman charity - बाप लेकीच्या नात्याची सुन्दर गोष्ट

  

roman charity - बाप लेकिच्या नात्याची सुन्दर गोष्ट 

   

       
      
           प्राचीन रोमन साम्राज्यामधे सर्वात लोकप्रिय चित्रामधे  roman charity या  चित्राची  गणना केली जाते . प्रसिद्ध रोमन चित्रकार  Bernardino Mio  यांनी ही अप्रतिम कलाकृती निर्माण केली . 
रोमचे  इतिहासकार Valerius Maximus यानी त्यांच्या Factorum auditorium memorabillium या पुस्तकामधे 
roman charity  चित्रा मागील गोष्टीचे रहस्य उलगडलेले आहे.
         प्राचीन रोममधे सिमोन हा वयोवृद्ध माणूस  केलेल्या गुन्हामुळे जेलमधील एका कोठडीत शिक्षा भोगत होता . सिमोनला अन्न आणि पाण्याशिवाय भुकेने तडफडत तडफडत मरण्याची शिक्षा सुनावली होती व त्याची कड़क अंमलबजावणी केली जात होती. पण सिमोनची मुलगी पेरूने राजाशी विनंती केली की '' माझे वडील आता काही दिवसाच्या जिवंत राहणार आहेत,  कृपा करून मला तुम्ही वडिलांशी रोज काही वेळ भेटू द्यावे. राजन पेरुची  विनंती मान्य केली.
        3-4 आठवडयानंतर पहरेकरीनी असा विचार केला की सिमोन अन्न आणि  पाण्याशिवाय तडफड़त भुकेने  मरायला पाहिजे होता पण तो अजुन जिवंत कसा आहे ,  सिमोन शरीराने अशक्त झाला होता पण त्याच जीवंत राहण हीच गोष्ट त्यांना फार अचंबित करणारी होती. पहरेकरींच्या मनात शंका येऊ लागली की एवढ्या कड़क बंदोबस्त असून सुद्धा सिमोनची मदत कोणीतरी करत आहे का?
       पहरेकारीनी या गोष्टीचा शोध घेण्याचा विचार केला. व त्यांच्या मधीलच एका पहरेकऱ्याने सिमोनच्या कोठडी जवळ लपून सिमोन वर लक्ष ठेऊ लागला.
       सिमोनची मुलगी पेरू सिमोनला भेटायला त्याच्या कोठडीत आली बाहेर कड़क पहारा होता.  पेरू हळूच सिमोनच्या जवळ गेली व पहारेकऱ्याची नजर चुकवत-चुकवत आपल्या स्तानमधील दूध सिमोनला पाजऊ लागली. आणि सिमोन निपचित तिचे दूध पिऊ लागला.
             कोठडी जवळ लपून बसलेला पहारेकरी हे सर्व पाहत होता त्याला हा प्रकार प्रचंड घाणेरडा आणि कीळसवाणा वाटला. त्याने सिमोन आणि पेरूला  राजा समोर हजर केले आणि त्याच्या समोर घडलेला प्रकार सांगितला. राजाला सुद्धा ही गोष्ट ऐकून संतापला
आणि त्याने बाप लेकिच्या पवित्र नात्याला कंलकित केल्याचा दोष ठेऊन दोघांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली तसेच समाजातील बहुतांश लोक राज्याच्या मतांशी सहमत होते, ज्या बाप लेकिने वडील--मुलगी सारख्या पवित्र नात्याचा अपमान केला त्याना मृत्यूदंडाची शिक्षा योग्यच आहे असे लोक सांगू लागले, पण समाजातील बुद्धिवादी लोकांनी याची सकारात्मक बाजु मंडली,  पेरुला तिच्या बापला काहीही करून जिवंत ठेवण्याची दृढ इच्छा होती. प्रसंगी ती तिचे शारिरीक लज्जा सोडून  बापाला स्तनपान करते, या वरुन पेरूच तिच्या बापावर असलेले विलक्षण प्रेम दिसून येते. एखादी मुलगी तिच्या बापवर एवढं प्रेम करण दुर्मिळ आहे .
      बुद्धिवादी लोकांनी मांडलेल्या या सकारात्मकबाजुमुळे समाजातील लोंकांचे मत बदलत गेले व पेरू आणि सिमोन बद्दल भावनिक लाट निर्माण  झाली व राजाने दिलेल्या मृत्यूदंडच्या  शीक्षेचा
विरोध करू लागली .राजाने ही जनतेच्या मताचा विचार करून पेरू आणि सिमोन ची शिक्षा माफ़ केली. व अश्या प्रकार पेरूच असेलेल तिच्या बापवर प्रेम अजरामर झाल.

       इतिहासात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्या अनैतीक असून सुद्धा आदर्श ठरवली गेली आहेत. कारण त्या घटना  मानवी मूल्यांवर खरी उतरली आहेत.

====================================

   
     


Thursday 23 November 2017

वायरल होणाऱ्या या व्हिडिओ मागचे सत्य



                    

      वायरल होणाऱ्या या व्हिडीओ मागचे सत्य 




    सध्या facebook / WhatsApp वर  वायरल होत असलेले the beginning  या व्हिडिओ ने धुमाकूळ घातलेले आहे. सोशल मीडिया वर हा वीडियो बघून लोकांना हसाव की रडाव हेच समजत नाही. या भावाला  the beginning अस म्हणायच आहे. अरे हा तर आपल्या सारखाच अडाणी (इंग्लिश बोलता न येणारा) असे कमेंट करून ट्रोल केल जात आहे. जाणून घेऊया या वीडियो मागची खरी कहानी.
             हा एक spoof विडिओ आहे .  या वीडिओ मधले माणुस दूसरे- तीसरे नसुन ते दक्षिण अफ्रीका चे  ४ थे राष्ट्रपती Jacob Zuma  आहेत. हा वीडियो दोन वर्षा पुर्विचा आहे. १२ /१०/२०१५ मधील दक्षिण आफ्रीका च्या  आफ्रिकन  नेशनल कांग्रेस सभेमधील हा वीडियो आहे. 
हा आहे खरा वीडियो÷÷


पण या original वीडियो मधे सुधा  विनोद आहे . NUMBER सांगताना त्यांचा गोंधळ उडाला आहे. 

   JACOB ZUMA च शिक्षण जेमतमच आहे त्यामुळे त्यांचा SPEECH COMPLECTION हा नेहमी चर्चेचा विषय होऊंन जातो.