Monday 12 March 2018

कोका-कोला कंपनी आपल्या पहिल्या वर्षी केवळ २५ बाटल्याच विकू शकली होती.(पाहा प्रेरक गोष्टी)

१ - कोका-कोला कंपनी आपल्या पहिल्या वर्षी केवळ २५ बाटल्याच       विकू शकली होती. हे एक उत्तम उदाहरण आहे की, अपयशी          झालो असलो तरी सुद्धा आपण आपल काम करत राहिल
     पाहिजे.

 २ -  बिल गेट्स यांनी त्यांच्या एका प्राचार्याना सांगितले होते कि, मी
       वयाच्या ३० व्या वर्षी करोडपती होईन. पण वास्तवात बिल             गेट्स  वयाच्या ३१ व्या वर्षी अब्जाधीश झाले होते.

३ -  बिली ओवेन या व्यक्तीला कॅन्सर मुळे चेहर्‍याचा अर्धा भाग
      आणि एक डोळा गमवावा लागला. पण त्यानंतर बिली ओवेन
      यांनी स्वतः ला एक झोंम्बी (zombie) कलाकाराच्या रुपात           प्रस्तुत केले आणि आज बिली आवेन लोकप्रिय कलाकार म्हणून       प्रसिद्ध आहेत.

  ४  -   भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी यांचा जन्म ४ फेब्रुवारी
          १९२२मध्ये झाला. त्यांनी वयाच्या ११ व्या वर्षी गुरुच्या
          शोधात घरातुन पळुन गेले होते. रेल्वेने प्रवास करत असताना
          टी. सी. ने त्यांना टिकीट मागितले तेव्हा भीमसेन जोशी यांनी 
         "जागो मोहन प्यारे " आणि "कौन - कौन गुण गाये " हे गाणे
         टी. सी ला राग भैरव मध्ये ऐकवुन फुकट मध्ये प्रवास केला
         होता.
५ - टेलिफोनचा शोध लावणारे अलेक्झांडर ग्राहम बेल यांचे वडील 
    बहिऱ्या लोकांना भाषा शिकवणारे शिक्षक होते. व त्यांनी एका 
  बहिऱ्या मुलीशी विवाह केला होता. वडीलांपासुन प्रेरणा घेऊन   
   अलेक्झांडर बेल यांनी सुद्धा एका बहिऱ्या मुलीशी विवाह केला. 
   अलेक्झांडर बेल यांच्या आई आणि पत्नीने कधीही त्यांचा आवाज      ऐकला नाही. पण आज त्यांच्यामुळेच आपण आपल्या कितीही दूर असलेल्या मित्र-परिवार - नातेवाईक यांचा आवाज ऐकू शकतो. 

६- हा जगातील पहिला फोटो आहे. फ्रेंच विज्ञानिक जोसेफ  
         निओपेस निकेफोरे यांनी हा फोटो काढला आहे. पण हा एक  
       फोटो काढण्यासाठी त्याना १८२६ मध्ये ८ तास वेळ खर्च         करावा लागला होता.आणि आपल्याला एक फोटो काढण्यासाठीएका सेकंदापेक्षा कमी वेळ लागत आहे. 


७ - महान उर्दू शायर मिर्झा गालिब यांनी वयाच्या १३ वर्षी उमराव 
     बेगम यांच्याशी लग्न केले. गालिब यांना ७ मुले झाली पण त्यांच 
   एकही मुल १५ महिन्यांपेक्षा जास्त जगू शकल नाही. कदाचित 
 मिर्झा गालिब यांच हेच दुःख त्यांच्या शायरीतून उमटत असावे. 


न जाने कैसी नजर लगी है जमाने की , 
वजह ही नही मिल रही मुस्कराने की! 

८ - सुर्याभोवती पृथ्वी फिरते, सुर्यासारखे अनेक तारे आहेत. 
          त्याच्याभोवती पृथ्वीसारखे अनेक ग्रह आहेत आणि त्याच्यांवर जीवसृष्टी असू शकते,असे मत मांडणारा जिओर्डानो ब्रुनो यांना  बायबल विरोधी मत मांडल्याबद्दल १७ फेब्रुवारी १६०० रोजी क्रुसावर बांधुन जाळण्यात आले. 

 ९ - २००६ मध्ये ट्विटर ची सुरवात झाली. पण पहिले तीन वर्षे 
       ट्विटर चे उत्पन्न झिरो डॉलर होते. पण आज ट्विटर वर्षाला २.५३ बिलियन डॉलर पेक्षा जास्त कमाई करते. 

१० -  थाॅमस एडीसन यांनी पहिल्यांदा इलेक्ट्रिकल वोट रेकॉर्डर तयार केले होते. पण त्यानां व्यवसायिक यश मिळाले नाही. त्यामुळे त्यांनाआर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यानीएडीसन युनिवर्सल स्टॉक प्रिंटर तयार केले. त्यासाठी त्यांना५०००डॉलर खर्च आला होता पण त्यानी ३००० डॉलर पर्यंत विकण्याची  तयारी दर्शवली होती. गोल्ट स्टॉक टेलीग्राफ या कंपनीने तो युनिवर्सल स्टॉक प्रिंटर केवळ ४०००० डॉलर ला खरेदी केला.