Tuesday 27 November 2018

मोठे - मोठे स्वप्न कधीच पुर्ण होत नाहीत अशी मनाची समजूत घालून, सामान्य आयुष्य जगायच निर्णय घेणार्‍यांनी एकदा नक्कीच या गोष्टी वाचा





अब्दुल कलाम यांनी १९५० मध्ये संत जोसेफ काॅलेज मधून bsc ची डिग्री पूर्ण केली पण त्यांना नंतर लक्षात आले की केमिस्ट्री आणि फिजिक्स हा त्यांचा पिंड नाही तर त्यांची खरी आवड इंजिनिअरिंग क्षेत्रात आहे. म्हणून त्यांनी एम.आय. टी.(madras institute of technology) मध्ये प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला. पण एम.आय.टी. मध्ये अॅडमिशन ची रक्कम १००० रुपये होती व त्या काळात ही रक्कम फार मोठी होती. त्यामुळे अब्दुल कलाम यांनी इंजिनिअरिंग करण्याचा विचार सोडून दिला. तेव्हा त्यांची बहिण जौहरा यांनी सोन्याचे दाग- दागिने गहाण ठेवून त्यांना पैसे दिले. त्यादिवशी अब्दुल कलाम फार भावूक झाले होते व लवकरात लवकर बहिणीचे दागिने सोडविण्याचा त्यांनी निश्चिय केला.


अरुणिमा सिन्हा या राष्ट्रीय स्तरावरील व्हाॅलीबाॅल खेळाडू होत्या. २०११ साली रेल्वेतुन प्रवास करताना त्या रेल्वेत चोरट्यानी त्यांच्यावर हल्ला केला. चोरट्यानी अरुणिमा सिन्हा यांना रेल्वेतुन बाहेर फेकुन दिले त्या अपघातात अरुणिमा सिन्हा यांना आपला एक पाय गमवावा लागला. तरीही परावलंबी आणि निराशमय जीवन न जगता त्यांनी सकारात्मक जीवन जगण्याचा निश्चय केला. २०१३ साली अरुणिमा सिन्हा या जगातील सर्वोच्च शिखर एवरेस्ट सर करणार्‍या पहिल्या भारतीय महिला आहेत. २०१५ साली भारतीय सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. 


एक मध्यमवर्गीय कुंटुब - वडील लहान असताना वारले - आर्थिक तंगीमुळे ५ वीत शिक्षण सोडाव लागले तरीही फ्रेंच भाषा, पियानो आणि नृत्यामध्ये उत्तम - पैसे कमावण्यासाठी पारंपारिक संगीत ग्रुप आणि नाईट क्लब मध्ये व्यावसायिक नृत्यांगना म्हणून काम करावे लागले - देशाच्या प्रसिद्ध नाट्यालयामध्ये अभिनय.
       अर्जेंटिना आणि जगातील पहिली महिला राष्ट्रपती
            मारिया एस्तेला ईसाबेल मार्टिनेज दी पेरोन


अमेरिकेचे विसावे राष्ट्रपती जेम्स गॅरफील्ड यांचे ग्रीक आणि लॅटीन भाषेवर प्रभुत्व होते. ते एकाच वेळेस एका हाताने ग्रीक तर दुसऱ्या हातने लॅटिन भाषा लिहू शकत होते. पण वयाच्या १६ व्या वर्षी जेव्हा त्याच्या वडीलांचे निधन झाले तेव्हा त्यांना प्रचंड आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागले व यामुळे त्यांना शाळा व घरदार सोडुन एका बोटीवर पैसाची चणचण भासू नये म्हणून कमी मोबदल्यात काम करावे लागले होते. 


अभिनयाची प्रचंड आवड पण स्पीच डिसॉर्डर आणि अडखळत बोलण्याच्या समस्यामुळे अनेक टीव्ही शो ने नाकारले. मित्र परिवार आणि लोकात " तु वेड्यासारखं अभिनय करतोस तु कधीच अभिनेता होऊ शकणार नाहीस" अशी अपमानास्पद वागणूक मिळाली. पण निराशा मध्ये न जाता त्यांनी स्वतःचा शो काढला आणि त्या शो चे नाव होते mr. Bean. आणि पुढचा इतिहास तर तुम्हाला माहित आहे.



लहानपणा पासून त्याला दम्याचा विकार होता. लोकांनी त्याला विचारल की मोठेपणी तुला कोण व्हायच आहे तर तो सांगायचा, की मला जगात अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू बनायच आहे. हे ऐकुन लोक त्याची चेष्टा करायचे पण त्यान तो अपमान कधीच मनावर घेतला नाही. ध्येय कधीच नजरेआड होऊ दिल नाही. अथक परिश्रमाने आणि जिद्दीने तो तेरा ग्रँडस्लॅम विजेतेपदाचा मानकरी ठरला. जगातील अव्वल क्रमांकाचा टेनिसपटू नोवोक जोकोविच.