Saturday 2 December 2017

Mark twain biography in Marathi (मार्क ट्वेन जीवन परिचय )




                    मार्क ट्वेन जीवन परिचय 

     "स्वतः आनंदी राहण्याची  उत्तम पध्दत म्हणजे दुसऱ्यांना                आनंदी  ठेवण्याचा प्रयत्न करणे".

                                                                मार्क ट्वेन 

   


 

मार्क   ट्वेन हे विनोदी आणि उपहासात्मक साहित्यिक, समाजवादी आणि निरीक्ष्वरवादी चे पुरस्कर्ते, निबंधकार, कथाकार आणि २८ अजरामर साहित्याचे जनक आणि गुलामगिरी, वर्णव्देष या विषयावर निर्भीडपणे मत व्यक्त करणारा व्याख्याते म्हणून जगभर ओळखले जातात. 

   मार्क ट्वेन यांचे खरे नाव सैमुअल ल. क्लेमेंस. वडीलांचे नाव जॉन मशर्मल क्लेमेंस  अणि आईचे नाव जेन लम्पटो क्लेमेंस होते. 
जॉन हे टेनसी देशाचे व्यापारी होते व् आई गृहिणी होती.
हैली हा धूमकेतु दर ७५वर्षानि  पृथ्वीविच्या जवळून जातो . 
१८३५मधे हैली धूमकेतु पृथ्वी जवळून गेल्यानंतर दोनच हप्त्याने मार्क ट्वैन यांचा जन्म फ्लोरिडा, मिसिसीपी मधे झाला. त्यांचा जन्म सातव्या महिन्यातच झाल्यामुळे ते  नेहमी अशक्त व् आजारी  असत. त्याची आई जेन सांगत '' मी जेव्हा त्याला पहिल्यांदा पाहिले, तेव्हा तो जगेल की नाही याची मला शंका आली होती. 
          १८३९मधे वयाच्या ४वर्षी क्लेमेंस फॅमिली हन्नीबाल ,मिसिसिपी इथे स्थलांतर झाली. हाँनिबल मधे गुलामगिरी होती तिथे गुलमाना क्रुरतेने वागवले जात. पुढे जाऊं याच विषयावर मार्क ट्वेन यांनी आपल्या लेखनातून टिका केली. मार्क ट्वेन यांचा आई चा स्वभाव हसरा ,आनंदी आणी मनमिळाऊ होता याच्या अगदी उलट त्यांच्या वडिल्याचा स्वाभाव होता.  ते कड़क शिस्तीचे होते . मार्क यानी त्यांना कधीच हसताना पाहिलेल नव्हत .
               १८४६मधे वयाच्या ११ व्या वर्षी  मार्क ट्वेन यांचा वडीलांचे न्युमोनिया मुळे निधन झाले , वडीलांच्या झालेल्या अकस्मात निधना मुळे त्याना आर्थिक आडचणीचा सामाना करावा लागला होता. मार्क ट्वेन चे चरित्रकार एवेर्त्त एमेरों  लिहतात '' वडिल्यांच्या निधानानंतर  मार्क याना आर्थिक त्रास सहन करवा लागला, पण त्याच  बरोबर हन्नीबाल  मधील होत असलेल्या हिंसाचाराच सुधा त्यानी अनुभवला पाहिला .''  वयाच्या ९व्या वर्षी त्यानी  एका माणसाची जनावरच्या पायदळी तूडवुन केलेली हत्या त्यानी पहिली होती तसेच एका गुलामाच तडफडत - तडफडत मृत्यू होताना पहिला. त्याच्या मालकान् त्याला लोखंडयाच्या पत्राने  मारल होता. हन्नीबाल मधे एकीकडे नैसर्गिक सुंदरता होती व  क्रूरता आणि हिंसाचार होता. या दोन्ही गोष्टीचा परिणाम त्यांच्या लिखानत दिसून येतो.
             आर्थिक चणचण दूर करण्यासाठी वयाच्या १२व्या वर्षी हन्नीबाल कुरियर मधे  शिकाऊ प्रिंटर म्हणून काम केल . तीन वर्षानी हन्नीबाल वेस्टर्न यूनियन मधे पाहुणा लेखक आणि संकलक  म्हणून त्यानी काम केल. त्यानी वाफेवर चालणाऱ्या जहाजाचे (steam boat) पायलटचे लायासन घेतले. पायलट असताना त्याना मार्क ट्वेन हे नाव सुचल, मार्क ट्वेन म्हणजे मार्क नं. २ म्हणजे १२ फुट, वाफेवरील जहाजावर प्रवास करणाऱ्या साठी पाण्याची सुरक्षित पातळी. १२ फुट पेक्षा कमी पाण्याची पातळी जहाजा साठी सुरक्षित नसते. त्याचबरोबर  मार्क ट्वेन यांनी थॉमस जेफरसन स्नोदग्रस ,सेर्जन्ट फस्थोम ,रम्ब्लेर हे टोपण नाव वापरले.
      मार्क ट्वेन याना कायमस्वरूपी  वर्जिनिया सिटी टेर्रिटेरिअल एंटरप्राइज मधे पत्रकार म्हणून नोकरी भेटली.    हायपर मधे त्यांच पाहील लेख प्रकाशित झाल, चुकीने मैक स्वाइन हे नाव छापुन आल होत. पण१८६५ साली न्यूयॉर्क टाइम सैटरडे मधे प्रकाशित झालेल्या "The celebebrated jumping frog of calaveras country" या लेखाने मार्क ट्वेन प्रकाश झोकात आले.
    १८६७ साली पाच महिने मेडिटेर्रनीं येथे  वास्तवात असताना मार्क ट्वेन यांची भेट त्यांची भावी पत्नी ऑलिविआ लँगदों झाली. १८६९ वयाच्या ३४व्या वर्षी त्यांनी लग्न केल. व याच वर्षी मार्क ट्वेन यांची पहिली कादंबरी" The innocents Abroed प्रकाशित झाली. ही कादंबरी त्यांनी मेडिटर्रनीं मधे आलेल्या प्रवासी अनुभवांवरून लिहिली होती. Roughing it(१८७२),Life of Mississippi (१८८३) या आणखी त्यांच्या प्रवासी कथांवर आधारित कादंबरी आहेत.
          मार्क ट्वेन यांची लिखाणाची विशिष्ट पद्धत, विनोदी - उपहासात्मक टीका, गुलामगिरी - वर्णद्वेष या गोष्टीवर त्यांनी  मांडलेली निर्भीड मते आणि त्याचबरोबर अमेरिकन लोकांना दिलेली अंतर्भूत करणारी उदारत्मकवादी दृष्टी दिली.  यामुळे ते लोकप्रिय झाले. Luck, A ghost story , Eve's diary  या त्यांच्या कथा सुप्रसिद्ध झाल्या. The Adventures of Tom Sawyer , The adventures of huckleberry finn   या कादंबरी जगभरातील अनेक भाषेत भाषांतरीत झाल्या. व मार्क ट्वेन यांची जगातील नामवंत लेखकामधे गणना केली जाऊ लागली.
   मार्क ट्वेन यांना विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयी रुची होती त्यांनी Paige compositer, mechanical typewriter with mechanical arm या नवीन  शोधामधे गुंतवणुक केली  पण यात त्यांना अपयश आल. प्रसिद्ध शास्त्रज्ञ निकोला टेस्ला हे मार्क ट्वेन यांचे अत्यंत जवळचे मित्र होते.
    मार्क ट्वेन यांना लँगदों, सुसी, जेन, क्लारा ही चार मुले झाली. पण दुर्दैवाने लँगदों(२), सुसी(२४), जेन(१९) वयाच्या वर्षी निधन झाले. व १९०४ मधे पत्नीचे (६४) निधन झाले. त्यामुळे जीवनाच्या शेवटच्या काही वर्षात एकाकी रहाव लागल, त्यामुळे त्याना नैराश्यासारख्या मानसिक आजाराचा सामना करावा लागला.
    १९०९ साली एका कार्यक्रमात ते मृत्यूविषयी मत मांडतात "हैली हा  धुमकेतू दर ७५ वर्षानी पृथ्वी जवळुन जातो. ७५ वर्षापुर्वी तो जेंव्हा पृथ्वी जवळुन गेला तेव्हा मी आलो होतो म्हणजे माझा जन्म झाला. व ७५ वर्षानी तो आता परत येत आहे, मला त्याच्याबरोबर जाव लागेल. मी जर नाही गेलो तर काहीच अर्थ राहणार नाही. हैलीच आणि माझ नात आहे, कदाचित मी त्याच्याबरोबर जाईन.
      मार्क ट्वेन यांची भविष्यवाणी खरी ठरली, २१/०४/१९१० हैली धुमकेतू  पृथ्वीच्या जवळुन गेल्यानंतर एक दिवसांनी मार्क ट्वेन यांच रेडिंग निधन झाले. 
        पण त्यांच्या निधनानंतर सुद्धा त्यांची लोकप्रियता कमी झाली नाही. निधनानंतर मार्क ट्वेन यांची चार पुस्तके प्रसिद्ध झाली,
           * Letters from the earth
          * Queen Victoria's jubilee
          * mark twain notebook 
          * The Mark Twain Autobiography
    ही चारही पुस्तके best seller ठरली. एकोणिस, वीस आणि एकोणीस या तिनही शतकात मार्क ट्वेन यांचे साहित्य best seller ठरली आहेत. त्यांनी मांडलेले विचार आजही महत्वपूर्ण व लोकप्रिय असल्याची ही पावतीच आहे.
         मार्क ट्वेन यांच्या स्मरणार्थ १९७६ मधे  एका लघुग्रहाला २३६२ mark twain हे नाव दिल गेल. व कैनेडी सेंटर
हे दर वर्षी अमेरिकेन विनोदी साहित्यात उत्तम कामगिरी करणाऱ्यांना. " The Mark Twain prize for American Houmor" या नावाने पुरस्कार दिला जातो.


No comments:

Post a Comment